माणूस हा स्वार्थी की सारथी



माणूस हा स्वार्थी की सारथी

कधी कधी मी याच गोष्टीचा अर्थ शोधत आहे की मला पाहिजे तरी काय, कितीही आयुष्य गेले तरी देखील कष्ट करणे आलेच नाही का.
खूप काही गोष्ठी मनात ठेऊन जगायला लागत असते मित्रांनो, हा प्रत्येकासाठी अनुभव वगळा असेल असे नाही की सर्वांसाठी सारखा असेल नाही का, असो आजचा संदेश एवढा काही खास नाही की तू तुमच्या सर्वांसोबत खुलासा करावा असा परंतु सांगायचे एवढ आहे की माणसाने किती धावपळ करावी, हे करू का ते करू, हा असे की तसे शेवटी सगळे करता करता माणूस थकणार हे मात्र तेवढेच बरोबर मग शेवटी माणूस एवढी धावपळ करतो कोणासाठी, परिवारातील सदस्यांसाठी की स्वतःसाठी. एकंदरीत बघायला गेले तर माणूस हा स्वतःसाठी जास्त करतो ते कसे आपण समजून घेऊ.
'A' नावाचा व्यक्ति आहे त्याच्यावर जिव लावणारे त्याचे आई वडील भाऊ बहीण बायको मुले असतात परंतु जेव्हा तो त्याचा स्वतःचा विचार करतो म्हणजे तो काळजी घेईल कारण त्याच्या हृदयात परिवारासाठी जागा आहे, तो त्याच्या आरोग्याची काळजी घेईल की स्वतःला काही होऊ नाही द्यायच, जर त्याला काही झाले तर परिवार आणि त्यांच्यासाठी काही करता येणार नाही म्हणून त्याला जगणे गरजेचे आहे. म्हणूनच माणूस हा स्वार्थी असतो. पण ही बाब सर्वाना मान्य होईल का? तर नाही,परंतु उत्तर हो असेल असेही नाही. काही लोक यात येत नाही म्हणूनच मी उल्लेख माणूस असा केला. आणि माणूस म्हणजे काय याचा अर्थ आपण पुढील लेखात समजून घेऊ सध्या तरी नको. बाकी आज साठी एवढेच बाकीचे बघूयात पुढील लेखात..... याच लेखाचा पुढील भाग लवकर येईल


--अॅड. परिमल बांबेरे
Post a Comment

Post a Comment